.

कुमारी द्वारे येशूचा जन्म हा सिद्धांत इतका महत्वाचा आहे की यावर आमचे तारण व सार्वकालिक जीवन निर्भर आहे .
जो मुद्दा शेवटी लिहायचा तो आधीच लिहीत आहे जर कोणी कुमारी द्वारे येशूचा जन्म नाकारतो तो ख्रिस्तविरोधी व सैतानाचा आहे व त्याने देवाला ओळखले नाही .
योहान पहिल्या पत्रात लिहतो जर कोणी येशू ख्रिस्ताचे देहधारण नाकारतो तो ख्रिस्तविरोधी आहे .आणि जो आत्मा देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे.१ योहान ४:३ .
I .कुमारी मारियेद्वारे येशूचा जन्म झाला यावर काही आक्षेप/विरोध
१.काही शिकवितात की कुमारी द्वारे जन्म काही अलौकिक नाही तर असा जन्म अनेक संप्रदायात व धर्मात आहे .उदाहरण -प्लॉटोचा जन्म , मिसरमधील होरस व आई इसिस ,बुद्धधर्म ,हिंदू धर्म ,कार्थेज ,अशूर,चीन ,जपान व बाबेलोन अश्या अनेक देशांमध्ये कुमारी द्वारे पुत्रास जन्म देणे प्रचलित आहे .
ख्रिस्ताचा कुमारी द्वारे जन्म व इतर कथानांन मध्ये जो मोठा फरक आहे तो असा की इतर संप्रदाय शिकविता की त्यांच्या दैवतांनी कुमारी सोबत समागम केला परंतु पवित्र शास्त्रातिल साक्ष स्पष्टपणे शिकविते की मरीयेच्या पोटी जो गर्भ होता तो पवित्र आत्म्याच्या चमत्कारिक कार्यामुळे उत्पन्न झाला .देवाने मारियेसोबत समागम केले नाही .
पवित्र आत्मा मारियेवर आला व परात्पराचे सामर्थ्य तिच्यावर छाया केले याचा अर्थ – स्वतः देवाने मरीयेच्या गर्भाचे उत्पत्ती केली ,सरंक्षण व जतन केले ज्यामुळे मारियेमधील पाप स्वभाव येशूच्या मानवी स्वभावात शिरू नये म्हणून देवाने पवित्र आत्म्याच्या योगे गर्भाचे संरक्षण केले .पवित्र आत्मा तुझ्यावर येईलआणि परात्पराचे सामर्थ्य
तुझ्यावर छाया करील हे देवा मधील व मारिये मधील समागमाबद्दल शिकवीत नाही .पवित्र आत्म्याने भ्रूण विकास केला व त्याचे सरंक्षण केले .
देवाने समागम केला नाही व योसेफानेहि नाही . शुभवर्तमान वृतान्त शिकविता ,तरी तिला प्रथमपुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही; मग त्याने त्याचे नाव येशू ठेवले.मत्तय १:२५ .
पवित्र शास्त्रातील साक्ष ;येशूचा जन्म होईपर्यंत
“योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार
करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो
पवित्र आत्म्यापासून आहे.मत्तय १:
देवदूताने उत्तर दिले,“पवित्र आत्मा तुझ्यावर येईलआणि परात्पराचे सामर्थ्य
तुझ्यावर छाया करील;म्हणून ज्याचा जन्म होईल त्यालापवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.लूक १:३५
2.मॉरमॉन पंथाचे लोक असा विश्वास ठेवतात की परमेश्वराने मारियेसोबत समागम केले .पवित्र शास्त्रातील वृत्तांत कोठेही असे शिकवीत नाही .
३.इतिहासात अनेक उदारमतवादी व अनेक पंथांनी येशूचा जन्म कुमारी मारियेद्वारे झाला नाकारले .ज्यांचे मन निर्बुद्ध व अंधकारमय झाले आहे .
४.यहुदी संप्रदायाप्रमाणे मानले जाते की मारिया व एका रोमी सैनिक पॅन्थेरा द्वारे अनैतिक जन्म होतो .
II .कुमारीद्वारे येशूचा जन्म त्याच्या मनुष्यत्वाची सुरवात होती त्याच्या देवत्वाची सुरवात नव्हती .देव म्हणून तो नेहमी होता प्रारंभी ख्रिस्त होता ,ख्रिस्त देवासोबत होता व ख्रिस्त देव होता
III ..कुमारीद्वारे येशूचा जन्म तपासणी आणि पुराव्याच्या अधीन असणारा चमत्कार नव्हता .जसे आदाम माती पासून व हवा आदमच्या फासळी पासून बनविली .
IV .कुमारी मरीयेच्या उदरात ख्रिस्ताच्या देवपणाचा विकास झाला नाही तर मनुष्यत्वाचा विकास झाला .
V.कुमारी मारियेद्वारे येशूचा जन्मावेळी ख्रिस्ताने दैवत्व त्यागले नव्हते तर दैवत्व सोबत मनुष्यत्व स्वीकारले .उणे नाही तर अधिक होते .
VI .कुमारी मारियेद्वारे येशूचा जन्म त्याच्या मनुष्यत्वाला कमी करत नाही उदा , त्याचे शरीर मानवी नसून ते दैवी शरीर होते अश्यातील बाब नाही .भूक ,तहान ,शिक्षण ,वेदना व वाढ, या नैसर्गिक प्रक्रियेच्या अधीन होते .
VII . त्यास स्वर्गात मानव म्हणून निर्माण करून पाठविले असते तर तो पूर्ण मानव नसता .स्त्रीच्या गर्भात वाढ झाली त्याचे पूर्ण मनुष्यत्व सिद्ध करते .
IX .मानवी पित्यापासून गर्भधारणा झाली असती तर तो पूर्ण देव नसता .तुमच्या आमच्या प्रमाणे स्वभावतः पापी असता .आदाम चे मूळ पाप त्याला योसेफ व मारियेद्वारे प्राप्त झाले असते .म्हणून ज्याचा जन्म होईल त्यालापवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.लूक १:३५
X .स्त्रीपासून जन्म उत्पत्ती ३:१५ पूर्ण करते , स्त्रीची संतती सैतानाचे डोके फोडेल हि पहिली सुवार्ता पूर्ण करण्यासाठी मारियेद्वारे जन्म गरजेचे होते .
XI .कुमारी द्वारे जन्म व पूर्ण मानव होणे का अगत्याचे होते ?
#आमच्या बद्दल प्रतिनिधित्व आज्ञापालन करण्यासाठी .आमचा पहिला प्रतिनिधी आदाम पराजित झाला ,त्याने आज्ञा मोडल्या व पाप व मृत्यू जगात शिरले .
मनुष्याचा प्रतिनिधी म्हणून त्याने आज्ञापालन केले जेणे करून आम्ही नियमशास्त्राच्या आज्ञाभंगामुळे ओढवलेल्या शापापासून मुक्त होऊ .त्याने त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून देवाचा क्रोध शमविला .
# बदली प्रायश्चित- तुमच्या आमच्या जागी बलिदान होण्याकरिता देवाने नेमलेला शेवटचा ,पुरेसा व प्रभावी अर्पण होण्यास त्याला कुमारी द्वारे पूर्ण मानव होऊन यावे लागले .
म्हणून जर कोणी कुमारींद्वारे येशूचा जन्म नाकारतो तो ख्रिस्ताचे मनुष्यत्व व दैवत्व नाकारतो , देवाचे वचन नाकारतो ,ख्रिस्ताचे पापविरहित व पवित्र जीवन नाकारतो ,शेवटी तो येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे हे नाकारतो