
‘शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली,
आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून
आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह
व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता. ‘योहान 1:14
शब्द देही झाला !
ख्रिस्ताचे देहधारणा सर्व इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक घटना आहे: देवाच्या सर्वकालिक , सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, अमर्याद पवित्र पुत्राने मानवी स्वभाव धारण केला आणि मानवतेमध्ये एक व्यक्ती म्हणून जगला जो एकाच वेळी पूर्णपणे देव आणि पूर्णपणे मनुष्य दोन्ही होता.
ख्रिस्तजन्मोत्सवात विश्वासणारे केवळ एका बाळाचा जन्म साजरा करीत नाहीत, तर त्याचे “देहधारण” साजरे करतात. त्र्यैक देवातील दुसरी व्यक्ती तिचे देवत्व न गमावता देहामध्ये आली, जेणेकरून आपणा पाप्यांसाठी खंडणी देऊन आपल्याला देवपित्याच्या क्रोधापासून सोडवावे व आपल्या सर्व अपराधांची क्षमा आपणास मिळावी म्हणून अर्पण होण्यासाठी आली होती. त्र्यैक्य देवातील दुसरी व्यक्ती मानव झाली, जेणेकरून आम्हा मानवासाठी तिच्या कार्याद्वारे व कृपेने सार्वकालिक विसावा व आशा मिळावी. म्हणून ख्रिस्तजन्मोत्सवात आपण ख्रिस्त व त्याच्या परिपूर्ण कार्याचे साजरीकरण करतो.
त्याने आम्हामध्ये वस्ती केली!
आमच्यामध्ये वस्ती केली,शब्दशः “त्याचा तंबू ठोकला” (Gk. skēnoō), तंबू इस्राएल लोकांमध्ये देवाच्या वास्तव्याचे एक प्रतीक होते (cf. Ex. 25:8-9; 33:7). भूतकाळात, देवाने निवासमंडप आणि मंदिरात त्याच्या लोकांसोबत आपली उपस्थिती प्रकट केली होती. योहान १:१४ नुसार आता देव त्याच्या लोकांमध्ये देहधारनेद्वारे उपस्तीत होता , अशा प्रकारे, ख्रिस्ताचे आगमन मनुष्यासोबत देवाची उपस्थिती व सहभागीता आहे हे अदभूत व सांत्वनदायी सत्य शिकवते .
जुन्याकरारातील निवासमंडप आणि मंदिर देवाच्या मनुष्या मध्ये असलेल्या वास्तव्याचे प्रतीक होते परंतु ख्रिस्त त्यांची पूर्णतः आहे . ख्रिस्त जो सर्वकालिक देव आहे तो मनुष्य झाला जेणे करून त्याच्या क्रुसावरील कार्याने व कृपेने मानवाचे तारण व्हावे व आम्ही देवाच्या सार्वकालिक उपस्थितीत सदैव असावे .