पास्टर मंगेश रायारम , पुणे रिफॉम्ड बॅप्टिस्ट चर्च

खरी उपासना व पवित्र शास्त्र 

ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;कलस्सै ३:१६

कशी, का आणि कोणाची उपासना करावी हे बायबल शिकवते. पवित्र शास्त्राला डावलून केलीली उपासना देवाला गौरव देऊ शकत नाही , त्याचे कारण   पवित्र शास्त्रात  सत्य परमेश्वर कोण आहे व त्याची उपासना सत्यतेने कशी करावी हे प्रकट केले आहे . 

 मनुष्य केंद्रित उपासना ,मानव केंद्रीत शास्त्राभ्यास , केवळ मानव व  माणसाच्या गरजांवर भर देते.

  परंतु परमेश्वर केंद्रित व शास्त्रकेंद्रित उपासना  देवाच्या  गौरवावर भर देते . आजची उपासना करमणुकीचा विषय झालेली आहे. ज्या ठिकाणी केवळ सादरीकरण,मनुष्य ,वाद्य ,मनोरंजक वातावरण आणि भौतीक गोष्टींवर भर असतो.

  सादरीकरणाचे प्रयोग: प्रेक्षकांना मोहित करणारी उपासना!

आजची उपासना देवाला सादर करण्याऐवजी,प्रेक्षकांना  सादर करण्यात येते. ज्यावेळेस उपासना होते त्यावेळी वर्शीप लीडरसाठी  व समुदायाकरीता टाळ्यांचा व शिट्यांचा गोंगाट केला जातो. देवाला प्रसन्न करण्याऐवजी गर्दीत बुद्धी गहाण ठेऊन,अंगप्रदर्शन करून स्वतःची , समुदायाची व पुढाऱ्यांची भक्ती म्हणजेच व्यक्तिपूजा केली जाते . 

जरा  विचार करा, आपण परमेश्वरासमोर उभे आहोत . मीखाएल व गाब्रीएल पण देवासमोर उभे आहे.  तुम्ही गाब्रीएल व मीखाएलकरीता टाळया वाजवाल का ? किंवा परमेश्वराकडे लक्ष द्याल, त्याच्या मुखाकडे पाहून वंदन कराल ? 

पवित्र शास्त्र आधारित उपासना : खरी उपासना ही शास्त्र केंद्रीत असते व  शास्त्रामध्ये मुळावलेली  आहे.  उपासनेचे फळे देणारे झाड  पवित्र शास्त्राच्या सुपीक जमिनीत मुळावलेले असते . देव केवळ शास्त्रकेंद्रित ,ख्रिस्तकेंद्रित  व पवित्र आत्माच्या मार्गदर्शनाद्वारे केलेल्या उपासनेला मान्यता देतो व संतुष्ट होतो .

जॉन कॅल्विन   म्हणतात:- ‘‘उपासनेमध्ये जरि आपले चांगले हेतु असले तरी ते गर्जनेसारखे/गडगडाटासारखे  आहे. माणुस केवळ चुकांशिवाय काहीच करू शकत नाही जेव्हा तो स्वतःच्या मताने उपासना करण्याचा प्रयत्न करेल’’. देवाच्या आज्ञा व देवाचे वचनापेक्षा तो स्वतःच्या मताने उपासना करेल त्यावेळेस तो चुकांशिवाय काहीच करणार नाही’’

  स्वतःच्या मनाने केलीली उपासना  , उदा. मला असं करू वाटतं ,माझी अशी इच्छा आहे.देवाने मला सांगितले. 

   खरी उपासना शास्त्रआधारित आहे व  तीच उपासना देवाला मान्य आहे. शास्त्राच्या चौकटीत न बसलेली उपासना देवाला मान्य नाही. शास्त्रआधारित नसलेली उपासना ती असंबंधीत किंवा अप्रासंगीक आहे.शास्त्राला धरून नसलेली उपासना अनादरयुक्त आहे.

या आपण पवित्र शास्त्रातील देवाची उपासना त्याच्या वचनानुसार व त्याच्या मार्गाने करूया . 

One Response

  1. Very true. I am agree with you.

    ‭‭John‬ ‭4:24‬ ‭NRSV‬‬

    God is spirit, and those who worship him must worship in spirit and truth.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *