
उपासनेचे केंद्रस्थान – परमेश्वर पिता उपासनेचे केंद्रस्थान आहे
‘तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. ‘योहान 4:23
इस्त्राएल लोक परमेश्वराची उपासना करत असे, ज्याची पवित्रता, महानता, सामर्थ, गौरव व न्याय सिनाय पर्वतावर प्रकट झाले .लोक फार मोठया भीती व आदराने भरले गेले होते .हे सर्व पाहुन त्यांचा थरकाप झाला ज्यामुळे ते दुर उभे राहिले आणि मोशेला म्हणाले आमच्याशी तुच बोल, म्हणजे आम्ही ऐकू: देव आमच्याशी न बोलो तो बोलला तर आम्ही मरू …. निर्गम 20ः 19-21.
त्यांना मध्यस्थाची गरज होती व मोशे तो मध्यस्थ होता , तो येणाऱ्या परिपूर्ण मध्यस्थ येशू ख्रिस्त या कडे निर्देश करतो,त्यांनी सहजपणे मोशेला त्यांच्यात आणि देवामध्ये मध्यस्थाच्या पदावर असावे अशी इच्छा व्यक्त केली, कारण त्यांच्यात आणि त्यांच्या पवित्र देवामध्ये इतके अंतर होते की त्यांना भीती वाटली की ते त्याच्या उपस्थितीत राहण्यास योग्य नाहीत. देव जो नियम देणारा, तो पवित्र आहे म्हणून नीतिमत्वाची मागणी करतो हे नियमशास्त्र प्रकट करते. त्याच्या नीतिमत्व व पावित्र्यापुठे कोणीही उभे राहू शक नाही. ख्रिस्ताचे प्रकटीकरण हे ख्रिस्ती लोकांचे उपासनेचे केंद्र आहे.
पिता जो सिनाय पर्वतावर प्रकट झालेला तो कधी न बदलणारा, त्याचे नीतिमत्व ,त्याचे पावित्र्य काल, आज व युगानयुग सारखे आहे. परंतू नविन करारामध्ये तो ख्रिस्ताच्या पूर्ण कार्यामुळे देव पिता म्हणून प्रकट झाला. योहान ४:२३ पहा , ख्रिस्त देवाला पिता म्हणून संबोधतो. येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालनाद्वारे व अर्पणामुळे आता जे आपण देवापासून लांब उभे होतो ते आता जवळ आले आहो व महान व समर्थ देव आता येशू ख्रिस्तामुळे आपलं पिता झाला आहे .
पिता म्हणजे सांत्वन, सर्वोत्तम घनिष्टता. खात्रीशील प्रीती, सौम्यता, असीमीत, सहनशील प्रीती, करूणामय, दयाशील, अतुल्य कृपा पुरवणारा आणि नवीन करारात तो देव आणि येशुचा पिता म्हणून प्रकट झाला. तसाच प्रत्येक विश्वासणाऱ्याचा पिता म्हणुन प्रकट झाला आहे . जो विश्वासी ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने देवाच्या कुटुंबात दत्तक घेण्यात आला आहे अश्या सर्वांचा तो प्रेमळ पिता झाला आहे . किती सांत्वनदायी व अदभूत सत्य !
देव जो पिता ,त्याचे गुणविशेष , ईश्वरीनियोजन , करार व त्याचे निर्मितीचे व मुक्तीचे कार्य समजून उपासना करावी . जॉन कॅल्विन म्हणतात -‘‘ज्या ठिकाणी परमेश्वराच्या ज्ञानाचा अभाव आहे. त्याठिकाणी देवाची नव्हे तर भुताची उपासना होत आहे’’.
नियमशास्त्र तर देवाचे नीतिमत्व , पवित्रता प्रकट करते व ख्रिस्ताने तर देवाचे हृदय प्रकट केले जे अपात्र, अयोग्य लोकांकरीता असीमीत प्रीतीने भरलेले आहे.हे उपासकांनी लक्षात घ्यावे की देव जो त्यांचा पिता आहे त्याची उपासना ते ख्रिस्ताद्वारे करू शकतात व प्रत्येक वेळी परमेश्वर पित्याची उपासना ख्रिस्तामध्ये मध्ये व ख्रिस्ताद्वारे करणे योग्य आहे कारण त्याच्या शिवाय कोणीही मनुष्य देवासमोर उभे राहू शकत नाही. आपण पित्याची उपासना करतो हे उपासकांनी समजून उपासना करावी .
पास्टर मंगेश रायारम ,पुणे रिफॉम्ड बॅप्टिस्ट चर्च
८०८७६८५७१०